खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या दर

मुंबई: गेल्या आठवड्यात सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती. सोमवारी या आठवड्याच्या सुरवातीला सोन्याच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे तर चांदीचे दर महागले आहेत. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,600 तर 24 कॅरेटचा 54,110 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 695 रुपये आहे. 



देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 55,190 रुपये

  • दिल्ली - 54,260 रुपये

  • हैदराबाद - 54,110 रुपये

  • कोलकत्ता - 54,110 रुपये

  • लखनऊ - 54,110रुपये

  • मुंबई - 54,110 रुपये

  • नागपूर - 54,110 रुपये

  • पुणे - 54,110 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने