महाराष्ट्रातले मोदक अन् अनारसे गूगल सर्चमध्ये होते सर्वाधिक ट्रेंडींग

मुंबई: वर्ष २०२२ काही दिवसांतच संपणार असून नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. या वर्षभरात गूगल सर्चवर काय काय सर्वाधिक सर्च करण्यात आलं याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यात अनेक गोष्टींना सर्च करण्यात आल्या आहेत. पण जर खाद्य पदार्थांचा विचार केला तर महाराष्ट्राचा मोदक आणि अनारसे यांच्या रेसिपीजचा सर्च टॉप १० मध्ये असल्याचं दिसत आहे.




गूगल मोस्ट सर्च फूड रेसिपीज

  • पनीर पसंदा

  • मोदक

  • सेक्स ऑन द बीच

  • चिकन सूप

  • मलाई कोफ्ते

  • पॉर्नस्टार मार्टिनी

  • मार्गेरीटा पिझा

  • पॅनकेक

  • पनीर भुर्जी

  • अनारसे

याशिवाय गूगल लिस्टविषयी बोललो तर इंडियन प्रिमियर लिग, CoWIN, फीफा वर्ल्ड कप, एशिया कप, आईसीसी t20 वर्ल्ड कप यालाही भरपूर सर्च करण्यात आलं.काय आहे (What is) या कॅटॅगरीमध्ये अग्नीपथ स्कीम, नाटो, एनएफटी, पीएफआय, स्क्वायर रुट ऑफ फॉर काय आहे याचा सर्च सर्वाधिक होता.कसं करावं कॅटॅगरीमध्ये वॅक्सिनेशन सर्टिफीकेट कसं डाऊनलोड करावं, पीटीआरसी चलान डाऊनलोड, पॉर्नस्टार मॅटर्नि ड्रिंक बनवणे, श्रमिक कार्ड बनवणं, प्रेग्नंसीत मोशन्स कसे थांबवावे असे प्रश्न सर्वाधिक सर्च करण्यात आले होते.तर मुव्ही सर्चमध्ये ब्रह्मास्र, पार्ट वन शिवा, केजीएफ चॅप्टर पार्ट टू, द कश्मिर फाइल्स, आर आर आर आणि कांताराचा सर्वाधिक सर्च होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने