शिंदे गट-भाजपातले मतभेद चव्हाट्यावर; नेत्याने नितेश राणेंना सुनावलं!

मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान मतदारांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे. कणकवली नांदगाव इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही.



राणे पुढे म्हणाले, "निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणताही मंत्री माझ्याशिवाय पुढे विकासकामं करूच शकणार नाही. माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर मी एक रुपयाचा ही निधी देणार नाही." या विधानावरुन आता त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.दरम्यान शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी नितेश राणेंना सुनावलं आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "दमदाट्या करून ग्रामपंचायत जिंकता येत नसतात, त्यासाठी लोकांना आपलंसं करावं लागतं, या प्रतिक्रिये नंतर भाजप आणि शिंदे सरकारच्या आमदारांचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.ग्रामपंचायतीत निवडणुकीत स्थानिक पातळीचं राजकारण असतं. गावातील लोकांना जिंकून आणि त्यांना आपलंसं करून निवडणूक लढवली तर नक्कीच विजय होतो. तिथं धमकी किंवा दादागिरी करणं बरोबर नसून केलेलं विधान चुकीचं आहे असं मत शिरसाट यांनी व्यक्त केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने