पोस्टाच्या पेमेंट बँकेचा खातेधारकांना इशारा; इथून पुढे...

मुंबई: इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या ग्राहकांना नोटीस दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात IPPBOnline च्या नावाने बनावट कॉल करून लोकांची खाती रिकामी केली जात आहेत.पोस्ट ऑफिसच्या नावावर कॉल जॉब देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे ग्राहकांकडून त्यांचे खाते आणि वैयक्तिक तपशील घेतात. याशिवाय नोकरीच्या बदल्यात पैशांची मागणीही करतात. यानंतर वेगवेगळ्या माहिती आणि योजनांची लाच दाखवून लोकांची खाती रिकामी करतात. अशा गुन्हेगारांपासून सांभाळून रहाणे अत्यंत गरजेचे आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे की, आजकाल सायबर गुन्हे करणारे लोक आयपीपीबीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडत आहेत. विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसेच, तुमचे वैयक्तिक बँकिंग तपशील शेअर करू नका. त्यामुळे तुम्ही सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहाल.




अशा प्रकारे IPPB तुमचे खाते सुरक्षित ठेवा :

  • जर तुम्हाला कोणी IPPB च्या नावाने कॉल केला असेल तर विचार न करता तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

  • यासोबतच, नोकरीच्या कोणत्याही आश्वासनाच्या फंदात पडण्यापूर्वी, ज्या कंपनीच्या नावाने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती मागवली जात आहे, त्या कंपनीची सत्यता तपासा.

  • तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका.

  • कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीला पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी, कंपनी आणि व्यक्तीची सत्यता पडताळून पहा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने