बॉलीवूड पडले मागे, टॉलीवूडच्या कलाकारांची बाजी...

मुंबई: ह्या चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी कंटेंटवरील जगातल्या सर्वात प्रसिद्ध आणि अधिकृत स्रोत्राने 2022 च्या सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा केली आहे. IMDb वर असलेल्या महिन्याला 20 कोटी विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने ही टॉप टेन यादी निर्धारित केली आहे. द ग्रे मॅन आणि तिरूचित्राम्बालाम ह्यासह अनेक भाषांमध्ये सफल कलाकृतींमध्ये भुमिका बजावलेला धनुष ह्या वर्षीच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे.

IMDb चे 2022 साठीचे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कलाकार*

1. धनुष

2. आलिया भट्ट

3. ऐश्वर्या राय बच्चन

4. राम चरण तेजा

5. समंथा रूथ प्रभू

6. हृथिक रोशन

7. कियारा अडवानी

8. एन. टी. रामा राव ज्यु.

9. अल्लु अर्जुन

10. यश



2022 ची IMDb टॉप 10 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या यादीमध्ये असे कलाकार आहेत जे पूर्ण 2022 मध्ये IMDb च्या साप्ताहिक रँकिंगमध्ये सातत्याने सर्वोच्च स्थानी राहिले होते. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 20 कोटी व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूवर हे रँकिंग आधारित आहे.“जगभरातील लोक भारतीय सिनेमा, वेबसिरीज आणि कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी IMDb वर येतात आणि भारतीय कलाकारांची आमची टॉप 10 यादी ही जागतिक प्रसिद्धी निर्धारित करण्याचा आणि करिअरमधील मुख्य टप्पे आणि लक्षवेधी क्षण ओळखण्याचा मापदंड ठरली आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हंटले. “विविध क्षेत्रांमधील कलाकारांना जगभर नावाजले जाते व देशामध्ये त्यांच्या प्रतिभेच्या उंचीचे हे निदर्शक आहे.

धनुषसारख्या कलाकाराला मान्यता मिळून तो हॉलीवूड अभिनेते जसे रायन गोसलिंग आणि क्रिस इव्हान्सच्या सोबत भुमिका करताना दिसला आणि त्याबरोबर प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या RRR चित्रपटातील ज्यु,एनटीआर आणि राम चरण तेजा ह्यांचेही कौतुक केले जाते. समीक्षक आणि चाहत्यांनीही चित्रपटांमध्ये परतलेल्या ऐश्वर्या राय बच्चनचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले.”IMDb सोबत एक्सक्लुझिव्हली बोलताना आलिया भट्टने ह्या वर्षीच्या यादीमध्ये तिचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “2022 हे माझ्यासाठी चित्रपटांसंदर्भात आत्तापर्यंतचे सर्वांत संस्मरणीय वर्ष ठरले आहे- ह्या वर्षी माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी नेहमी त्यांची ऋणी राहीन आणि आपल्या देशातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते व कलाकारांसोबत काम करणे, हा माझा गौरव आहे असे मला वाटते. IMDb हे लोकांच्या मनामधील भावना दर्शवणारे खरे माध्यम आहे आणि मला आशा आहे की, मी‌ जोपर्यंत कॅमेरासमोर असेन, तोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन. प्रेम आणि प्रकाश. आपल्याला परत एकदा धन्यवाद.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने