खोक्यांच्या चौकशीसाठी तयार, आमची केवळ...; संदीपान भूमरेंनी राऊतांना सुनावलं

औरंगाबाद : एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात सातत्याने आरोप प्रत्यारोप होतायत. त्यातच शिंदे गटावर मागील अनेक दिवसांपासून खोके घेतल्याचा आरोप होतोय. यावरून शिंदे गटाने गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र तरी देखील खोक्यांचे आरोप सातत्याने होतायत. याच खोक्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्याला शिंदे गटातील नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं.संदीपान भुमरे म्हणाले की, अनेकवेळा सांगितलं की, संजय राऊत केवळ आरोप करतात. ५० खोक्यांचे आरोप सिद्ध करावे लागतील. काय चौकशी करायची ती करा, 



आम्ही चौकशीला तयार आहोत. संजय राऊत यांना काहीही आरोप करू द्या. केवळ आमची बदनामी सुरू असल्याचं भूमरे यांनी म्हटलं.संजय राऊत यांना काही काम नाही. त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. दुसरा काही पर्याय नसून केवळ शिंदे गटाला बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचं भूमरे म्हणाले. खोके आणि गद्दारच्या पुढे ते जात नाही. कोणताही घोटाळा झालेला नाही. सभागृहात उत्तर दिलं आहे. काहाही झालेलं नाही, असंही भुमरे म्हणाले.दरम्यान शिंदे सरकारने आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन प्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापन केली आहे. त्यामुळे आदित्य यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी खोक्यांची चौकशी कऱण्याची मागणी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने