गुजरातमधील या गावाशी अरूण जेटलींचे खास नाते; अस्थी विसर्जनही तिथेच केले!

दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी महाराज किशन जेटली आणि रतन प्रभा जेटली यांच्या घरी झाला. अरूण जेटली यांनी आपलं शालेय शिक्षण सेंट झेवियर्स स्कूल नवी दिल्ली येथून पूर्ण केले आणि त्यानंतर ते दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये गेले.अरुण जेटली यांचे वडील वकील होते. जेटली यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पदवी घेतल्यानंतर १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कायदा विभागातून कायद्याचे शिक्षणही घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अरूण जेटली यांनी सुप्रीम कोर्टात सराव सुरू केला. यानंतर जेटली देशातील प्रसिद्ध वकीलांच्या यादीत समाविष्ठ झाले. जानेवारी १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त केले. यापूर्वी १९८९ मध्ये अरुण जेटली यांना व्ही.पी. सिंग यांच्या पंतप्रधानपदी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बनविण्यात आलं होतं. यानंतर अरूण जेटली बर्‍याच मोठ्या प्रकरणांमध्ये दिसले.

अरुण जेटली यांनी तरूण वयातच राजकारणाच्या शाळेत प्रवेश घेतला होता. वयाच्या २२ व्या वर्षी जेव्हा ते पदवीधर झाले, तेव्हा १९७४ मध्ये ते दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडले आले. त्यानंतर ते विविध युवा आघाडी संघटनांशी संबंधित राहिले. नंतर जेटली यांना दिल्ली एबीव्हीपीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सचिव केले गेले.विद्यार्थीदशेपासून ते मंत्री झाल्यावरही त्यांची मातीशी असलेली नाळ घट्ट होती. गुजरातमध्ये जन्मलेल्या एका गावाशी त्यांचे अगदी खास नेते होते. त्यांची शेवटची इच्छाही याच गावात पूर्ण केली गेली. ती काय होती आणि ते गाव कोणते हे पाहुयात.



अरुण जेटली यांचे गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील करनाली गावाशी अगदी दृढ नाते आहे. या गावात कुबेर भंडारी मंदिर आहे. जेटली यांची या मंदिरावर प्रचंड श्रद्धा होती. जेटली येथून राज्यसभेचे खासदार असताना त्यांनी येथील चार गावे दत्तक घेतली होती, त्यात करनाली हे एक गाव होते. उरलेली तीन गावे पिपलिया, वाडिया आणि बागलीपुरा होती. ही सर्व गावे करनाली पंचायतीचा भाग होती. या गावांमध्ये त्यांनी अनेक विकासकामे केली.अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट 2019 रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. तेव्हा त्यांचे वय ६६ वर्षे होते. ते दीर्घकाळ आजाराशी झुंज देत होते. जेटली यांच्या निधनामुळे करनाली गावात बंद ठेवण्यात आला होता. जेटली यांच्या निधनाने दु:खी झालेल्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली.

गावातील लोक आजही सांगतात की, अनेक वर्षांपासून गावात बँक नव्हती. पण जेटलींच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे पहिल्यांदाच गावात नॅशनल बँकेची शाखा सुरू झाली. करनाली गावातील कुबेर भंडारी मंदिर आहे. ते नर्मदा नदीच्या पवित्र घाटावर आहे. जेटली यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी इथे आणण्यात आल्या होत्या. त्यावेळी जेटली यांचे संपूर्ण कुटुंब करनालीला पोहोचले. गावातील विद्वान ब्राह्मणांनी मंत्रोच्चार करून जेटलींच्या अस्थिकलशाची पूजा केली. त्यानंतर सोमनाथ घाटावर नर्मदेच्या पवित्र पाण्यात अस्थिकलशाचे विसर्जन केले.

गावातील लोक सांगतात की, अरूणजी आम्हाला कधीच परके वाटले नाहीत. ते नेहमीच आमच्यातील एक होऊन राहत असत. आम्हीही त्यांना आपलेच समजून  सर्व अडचणी त्याना सांगायचो. अरूणजी गेले तेव्हा आमच्या घरातीलच व्यक्ती गेल्यासारखे वाटले.अटलबिहारी वाजपेयी यांच्या तिसऱ्या कारकीर्दीत अरूण जेटलींना प्रथमच मंत्रिमंडळात जाण्याची संधी मिळाली. एनडीए सरकारमध्ये प्रथमच १३ ऑक्टोबर १९९९ रोजी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभारी) म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. काळाप्रमाणे जेटली यांच्या राजकीय वर्चस्व बळकट होत गेले.२००० साली त्यांना राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री पदावरून बढती मिळाली. या वेळी, त्यांना कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार सह जहाज वाहतूक मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं. नंतर जेटली यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच मंत्रीपद देण्यात आलं. सरकारसोबतच जेटलींची बढती संघटनेत देखील झाली.

जेटली आणि मोदी यांच्याचील साम्य

जेटली हे मोदींपेक्षा दोन वर्षांनी लहान असले तरी, विधिमंडळ आणि कार्यकारिणी या दोन्हींशी त्यांचे औपचारिक संबंध मोदींच्या आधी दोन वर्ष आले. ऑक्टोबर 1999 मध्ये वाजपेयींच्या सरकारमध्ये जेटली पहिल्यांदा मंत्री झाले. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर ते एप्रिल 2000 मध्ये गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आले. जेटलींना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्यात मोदींनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा ते भाजपच्या केंद्रीय संघटन सरचिटणीसची महत्त्वाची भूमिका बजावत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने