मुस्लिम पुरुष हिंदू मुलीची हत्या करतो, तेव्हा आम्ही..; असं का म्हणाले CM सरमा?

आसाम: श्रद्धा वालकर हत्याकांडावर  आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आपलं परखड मत व्यक्त केलंय. हा साधा गुन्हा आहे की लव्ह-जिहाद  हा वाद सुरूच राहील, पण कधीही न संपणारा हा मुद्दा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय.श्रद्धा वालकरची दिल्लीत तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला  यानं हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फेकून दिले. मुख्यमंत्री हिमंता सरमायांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'मी या प्रकरणाला लव्ह-जिहाद म्हटलंय आणि तुम्ही याला साधा गुन्हा म्हणत आहात, त्यामुळं काय आता ते जनतेला ठरवू द्या.'



सरमा पुढं म्हणाले, 'प्रकरणातील तथ्य आणि परिस्थितीच्या आधारे मी या निष्कर्षावर पोहोचलोय की, श्रद्धा वालकरची ही हत्या जिहादचं प्रकरण आहे. एखादी लव्ह-जिहादची केस असेल, तेव्हा आपण त्या केसचे काही मापदंड, तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेत असतो. त्याला प्रतिवाद करून तुम्हाला हे सिद्ध करायचंय की, हे लव्ह जिहादचं प्रकरण नाही, तर केवळ गुन्हेगारी प्रकरण आहे. हा धर्मनिरपेक्षतावादी आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष आहे. हा वाद सुरूच राहणार आहे.'

जेव्हा एखादा हिंदू माणूस त्याच्या प्रेयसीची हत्या करतो, तेव्हा आम्ही त्याचं गुन्हेगारी कोनातून विश्लेषण करू. पण, जेव्हा एखादा मुस्लिम व्यक्ती हिंदू मुलीची हत्या करतो, तेव्हा त्याचं विश्लेषण गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि लव्ह-जिहादच्या कोनातूनही करू. मुस्लिम समाजातील एक वर्ग उघडपणे म्हणतो की, ते जिहादी आहेत. प्रत्येकजण (असदुद्दीन) ओवैसी असेल असं नाही. प्रत्येकजण (ओसामा बिन) लादेन असेल असं नाही. ओवैसी कट्टरपंथी आहेत. मी त्यांना जिहादी म्हणणार नाही, असंही सरमा यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने