मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही; राऊतांचा सरकारला इशारा

मुंबईःमहाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी प्रतिक्रिया दिलीय.महाराष्ट्रात वारंवार महापुरुषांचा अपमान केला जात आहे. आम्ही काढत अ.सलेला मोर्चा विरोधी पक्षांचा नाही, तर महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे. आमच्या मोर्चात सरकारनंही सहभाही व्हावं, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे. आम्ही लोकशाही मार्गानं.असंही ते म्हणाले.



चित्रा वाघ यांच्या टीकेला उत्तर देताना राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे आहेत, असं म्हटलं. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 17 तारखेला होणाऱ्या या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन संजय राऊत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाही मार्गानं केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे. त्यामुळं 17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

आम्ही मोर्चा काढू नये असं वाटत होतं तर राज्यपालांना हटवायल पाहिजे होतं. आमच्या देवतांचा अपमान संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती करत आहेत, त्याचं समर्थन सरकार करतं, त्याविरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला विचारला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने