मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर फडणवीसांच अजब उत्तर; सभागृहात एकच हास्यकल्लोळ

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे. सीमाप्रश्नाचा वाद सुरु आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काल गंभीर आरोप करण्यात आले. अशातच आजच्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाला शिंदे गैरहजर राहिल्याने विरोधकांना ऐत कुळीत मिळालं.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री कुठे आहेत? अशी विचारणा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर फडणवीसांनी अजब उत्तर दिले. ज्यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.



नेमकं सभगृहात घडलं तरी काय?

विधानसभेच्या सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. उल्हासनगरच्या पाणीप्रश्नावरुन आमदारांनी सरकारला काही सवाल केले. मात्र सरकारकडून अपेक्षित उत्तर न आल्याने अजित पवार आक्रमक झाले. तसेच, प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री उपस्थित नाहीयेत, असा आक्षेप अजित पवार घेतल्यानंतर फडणवीस उत्तर द्यायला उभे राहिले. तुम्ही सभागृह चालू देणार आहेत हे आम्हाला माहिती नव्हते, नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले असते. असा खोचक टोमणा मारला.फडणवीसांच्या या उत्तरावर अजित पवारांनी उत्तर दिलं. सभागृह चालू देणार नाही हे तुम्हाला माहिती होतं, मग तुम्ही कसे आलात? असा प्रतिप्रश्न अजितदादांनी केला. ज्यावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने