मालिकाही प्रमोशनच्या शर्यतीत.. साकारले 100 फूटी 'लोकमान्य'...

मुंबई: 'झी' मराठी वाहिनीने आजवर अनेक ऐतिहासिक मालिका साकरल्या आहेत. आता ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे चरित्र घेऊन सज्ज झाले आहेत. 'लोकमान्य' असे या मालिकेचे नाव असून ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत अभिनेता क्षितीश दाते आणि स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या मालिकेचे एखाद्या चित्रपटा प्रमाणे दणक्यात प्रमोशन सुरू आहे. याच प्रमोशन दरम्यान लोकमान्य टिळक यांचा 100 फूटी बॅनर झळकवण्यात आला आहे.या ऐतिहासिक चरित्रगाथेच्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील लोकमान्य टिळक समाधी स्थळ, गिरगाव येथील चौपाटीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पगडी आणि नावाचे मिळून एक सुंदर वाळूशिल्प साकारण्यात आलं होतं. या वाळू शिल्पाने लक्ष वेधलेलं असतानाच आता नवा विक्रम या मालिकेने केला आहे.



या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी आता १०० फुटी बँनरचं अनावरण करण्यात आलं, नवीन मालिका सुरू होते आहे, हे इंनोवेटिव्ह पद्धतीने, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झी मराठी ने १६ डिसेंबर ह्या दिवशी भिवंडीतील एका नावाजलेल्या एका फ्लाईंग रेस्टॉरंटमध्ये मालिकेच्या १०० फूट पोस्टरचे अनावरण केले. यावेळी स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते दोनही कलाकार उपस्थित होते. या पोस्टरने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने