फडणवीस म्हणजे काय? हा शब्द मूळ मराठी नाहीच!

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून फडणवीस हे नाव राज्याच्या राजकीय वर्तूळात चर्चेत आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामूळेच. देवेंद्रजीं मागील टर्ममध्ये मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले तर सध्याच्या काळात ते उपमुख्यमंत्री आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर टिका करण्यात आली तेव्हा तेव्हा त्यांच्या नावाच्या अर्थावरूनही अनेकदा पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. फडणवीसांच्या अडनावाचा पूर्ण अर्थ काय, असा प्रश्न तूम्हालाही पडला असेल, तर आज जाणून घेऊयात त्यांच्या नावाचा खरा अर्थ काय आणि तो शब्द कुठून आला त्याबद्दल.



फडणवीस या नावाचा अर्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता. फड म्हणजे फळा आणि फळ्यावर लिहणारे म्हणजे फडणवीस, असे ते म्हणाले होते. खरच त्याचा अर्थ काय आहे, हे पाहुयात.फड म्हणजे राज्यकारभारातले एक कारकुनी खाते होते. त्यात शेकडो कारकून असत. ते एकप्रकारे त्याकाळचे सचिवालयच होते. त्याला जोडून नीस हा शब्द येतो. 'नविश्तन्' या फार्सी क्रियापदाचा अर्थ लिहिणे असा होतो. नवीस्  हे त्याचे धातुरूप असून नीस हे त्याचे मराठीकरण झाले आहे. या नीसचा अर्थ लिहिणारा असा होतो. म्हणजेच, फडावरचे हिशेब लिहिणारा अधिकारी म्हणजे फडनवीस  किंवा फडनीस' होय.

पारसनीस - म्हणजे फार्सी भाषेचा जाणकार

पोतनीस - पोता म्हणजे फार्सी भाषेत तिजोरी, तिजोरीतल्या पैशाचा हिशेब ठेवणारा तो पोतनीस

कारखानीस - कारखान्याचे हिशेब ठेवणारा कारकून, तर, पागनीस - घोड्यांच्या पागेचा हिशेब ठेवणारा कारकून तो पागनीस

जमेनीस - जमीनीच्या जमाबंदीचा वसूल, उपज, उत्पन्न इत्यादींचा हिशेब ठेवणारा कारकून तो जमेनीस

सबनीस - किल्ल्यावरील सैनिकांच्या पगाराचा हिशेब ठेवणारा कारकून यात सब हा शब्द फारसी सफ़ म्हणजे रांग यापासून आला आहे.

चिटनीस- चिठ्ठयांचे पत्रांचे उत्तर देणारा असे इतरही अनेक नीस आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने