'अखेर पडद्यामागील सुत्रधार बाहेर! शहा यांच्या कृपेने पांड्या कर्णधार'

दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयने अलीकडेच पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका तितक्याच सामन्यांची खेळली जाणार आहे. ही मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. याआधी हार्दिकने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे, ज्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हार्दिक पांड्याने शनिवारी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दोन फोटो शेअर केले. पांड्याने कॅप्शन लिहिले की, 'आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आणि आमच्यासाठी मौल्यवान वेळ काढल्याबद्दल मी गृहमंत्री अमित शहाजींचा आभारी आहे. तुम्हाला भेटणे हा एक सौभाग्य आहे. त्यांच्या या भेटीनंतर सोशल मीडियावर नेटकरी त्याच्यावर टीका करत आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, अखेर पडद्यामागील सुत्रधार बाहेर आला आहे, त्याच्यामुळे हार्दिक पांड्या कर्णधार झाला.



29 वर्षीय हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष खूप चांगले गेले. त्याच वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला पदार्पणाच्या हंगामात आयपीएल चॅम्पियन बनवले. 2022 मध्ये त्याच्याकडे तिसऱ्यांदा संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. हार्दिकने आयपीएलच्या 15 व्या मोसमात बॉल आणि बॅटने थैमान घातले होते. त्याने 4 अर्धशतकांसह एकूण 487 धावा केल्या.हार्दिक पांड्याने यावर्षी जूनमध्ये पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. जूनमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यावर त्याने टी-20 संघाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर टीम इंडियाने नुकताच त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा दौरा केला. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही दौऱ्यांवर टी-20 मालिकेत संघाला विजय मिळवून दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने