'५० खोके' संपले; आता 'दिल्लीचे मिंधे...'; विरोधकांची नवी घोषणा

मुंबई : राज्याची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या आधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप कऱण्यात आले होते. तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू आहे. यावरून विरोधकांनी निदर्शने करत नवीन घोषणा दिली आहे. याआधीच्या अधिवेशनात विरोधकांनी '५० खोके एकदम ओके', अशा घोषणा देत शिंदे गटातील आमदारांवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी या घोषणा गाजल्या होत्या. मात्र यावेळी विरोधकांनी नवीन घोषणा देत थेट एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं आहे. यावेळी जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.




यावेळी विरोधकांनी श्रीखंडाचे डब्बे विधानभवनाच्या आवारात वाटप केले. या डब्ब्यांवर भूखंड अर्थात 'भूखंडाचे श्रीखंड' अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. शिवाय 'दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे' अशी घोषणाबाजीही केली. एकंदरीत गेल्या वेळच्या घोषणा अजुनही गाजत असताना आता ही नवीन घोषणा थेट शिंदेंविरोधात देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने