परेश रावल यांच्या बंगाली लोकांवरील विधानामुळे महुआ मोईत्रा भडकल्या; म्हणाल्या...

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे अभिनेते परेश रावल त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. यावर रावल यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना माफीही मागितली, मात्र त्यांच्या या विधानावर विरोधकाकंडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.एका जाहीर सभेत बोलताना परेश रावल म्हणाले होते की "गॅस सिलेंडरचं काय करणार? तुम्ही बंगालींसाठी मासे शिजवाल का? गुजरातची जनता महागाई सहन करेल, पण आपल्या शेजारी बांगलादेशी आणि रोहिंग्यांना सहन करणार नाही. यावर आता वाद निर्माण झाला आहे.



टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या, "बंगालींसारखे मासे शिजवणं हा त्यांच्या आयुष्याचा दुसरा भाग आहे. बंगालींसारखं मन असणं गरजेचं आहे. भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा बंगालने सर्वाधिक नोबेल पारितोषिक जिंकले आहेत.माजी खासदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मोहम्मद सलीम यांनी कोलकात्याच्या तलतला पोलिस स्टेशनला पत्र लिहून परेश रावल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून अभिनेत्यावर खटला चालविण्याची मागणी केली आहे. कारण त्यांच्या वक्तव्यामुळे बंगाली लोकांविरूद्ध प्रतिकूल मत तयार होत आहे. मोहम्मद सलीम यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, बंगालच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बंगाली लोक राहतात. परेश रावल यांनी केलेल्या अश्लील शेरेबाजीमुळे यातील अनेक जण पूर्वग्रहदूषित आणि प्रभावित होतील अशी भीती वाटते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने