'या' मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

मुंबई: कोविड, लॉकडाऊन आणि अनेक निर्बंध अशा दोन वर्षांच्या कठीण काळानंतर संपूर्ण जगासाठीच 2022 हे साल हे दिलासा देणार ठरलं. 2022 साल उजाडताच जवळपास सर्वच निर्बंध हटले. पुन्हा एकदा सगळं जैसे थे झालं. सिनेसृष्टीच्या ही जीवात जीव आला. या वर्षात अनेक रखडलेले सिनेमे आणि नवे सिनेमा रिलीज झाले.2022 सालामध्ये देखील अनेक मराठी सिनेमा चर्चेत आले. काही सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर काही सिनेमे प्रेक्षकांची मन जिंकण्यात फेर ठरले. 2022 सालामध्ये कोणत्या मराठी सिनेमांचा बोलबाला राहिला, कोणत्या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली याचा आढावा आपण घेणार आहोत.2022 या सालामध्ये वेगवेगळ्या धाटणीचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. यात कॉमेडी, सस्पेन्स, लव्हस्टोरीतर काही ज्वलंत विषयावर आधारित सिनेमे होते. सोबतच ऐतिहासिक विषयांवरील सिनेमे प्रदर्शित झाले. या सगळ्यांमध्ये प्रेक्षकांनी पसंती दिली ती म्हणजे महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना आणि म्हणूनच 2022 या वर्षात सर्वाधिक कमाई करून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला तो म्हणजे पावनखिंड हा सिनेमा.






या सिनेमाने भारतात 40 कोटींची कमाई केली तर संपूर्ण जगभरात जवळपास 43 कोटींचा गल्ला जमवला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमात घोडखिंडीतील रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. स्वराज्यासाठी आणि आपल्या राजासाठी बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंडीत आपलं रक्त सांडलं हा इतिहास सर्वांनाच ठाऊक असला तरी या सिनेमात बाजीप्रभूंसोबतच त्यांच्या खांद्याला खांदा देऊन प्राणाची आहुती देणाऱ्या इतर मावळ्यांची कथा आणि त्यांचे धैर्य पाहायला मिळतं. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून घोडखिंडीची पावनखिंड कशी झाली याचा प्रवास ऐकायला मिळतो. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली.

तर 2022 या सालामध्ये 'पावनखिंड'प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या धर्मवीर नेते आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारून त्यांने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. लोकनेते आनंद दिघे यांच्या या जीवन प्रवासाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली सिनेमा ब्लॉकस्टर ठरला. या सिनेमानंतर प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली ती म्हणजे 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. म'धर्मवीर'ने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींचं बॉक्सऑफिस कॅलेक्शन गाठलं. तर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकूण जवळपास 24 कोटींचा गल्ला जमवला. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा म्हणजे धर्मवीर नेते आनंद दिघे यांचा जीवनपट आहे.  सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून

सरसेनापती हंबीरराव’ हा प्रवीण तरडे दिग्दर्शित मराठी चित्रपट मनो जिंकण्यात यशस्वी ठरला. सिनेमाने देखील बॉक्स ऑफिस वर तगडी कमाई केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.हंबीरराव मोहिते हे या हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.2022 या वर्षामध्ये एकूणच ऐतिहासिक सिनेमांचा बोलबाला दिसून आला. कारण पावनखिंड, सरसेनापती हंबीरराव या सिनेमानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'हर हर महादेव' या सिनेमाने देखील बॉक्स ऑफिस वर तगडी कमाई केली. हा सिनेमा वादाच्या वावरात अडकल्याने या सिनेमातले अनेक शो बंद करण्यात आले होते मात्र असं असूनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. मी बॉक्स ऑफिस वर जवळपास नऊ कोटींचा गल्ला जमवला आहे. अभिजीत देशपांडे लिखित, दिग्दर्शित 'हर हर महादेव' हा सिनेमा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

तर यावर्षी रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास-3' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. टाइमपास सिनेमाच्या या तिसऱ्या सिक्वलमध्ये दगडू आणि प्राजक्ताची जोडी पाहायला मिळाली नसली तरी दगडू आणि पालवीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास साडेसात कोटींची कमाई केली.या सिनेमांपाठोपाठच 'बॉईज 3' आणि 'लोच्या झाला रे' या सिनेमांनादेखील बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं.तर मोठी स्टारकास्ट असलेले 'चंद्रमुखी' झोंबिवली आणि 'दे धक्का' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली नसली तरी प्रेक्षकांचा या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने