बॉडी शेमिंगवरुन बोलल्यानंतर अपूर्वा नेमळेकर भडकली, म्हणाली “राखी तुझ्यासारखी प्लास्टिक सर्जरी करुन…”

मुंबई: बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे. राखी सावंतने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यापासूनच घरात धुमाकूळ घातला आहे. काहीतरी करुन राखी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.कॅप्टन्सी टास्क दरम्यान बाद केल्यामुळे राखीने अमृता देशमुखवर पीठ टाकत घरात राडा केला. त्यानंतर दुपारी जेवताना डायनिंग एरियामध्येही ती अमृताला त्रास देताना दिसली. त्यावर अपूर्वा नेमळेकर “लंच टाइम झाला आहे, त्यामुळे अमृताला जेवू दे. तुम्ही नंतर बोला” असं राखीला म्हणाली. यावर राखीने बॉडी शेमिंग करत घरातील सदस्यांबाबत “बिग बॉसच्या घरातील खाऊन खाऊनच कमरेचे कमरा झाले आहेत” असं वक्तव्य केलं.



राखीचं हे बोलणं ऐकून अपूर्वा संतापली. ती राखीला म्हणाली “राखी, याआधीही तू दोन-तीन वेळा माझ्या वजनावर बोलली आहेस. मी मल्टिपल सर्जरी करत नाही. माझी नॅचरल ब्युटी आहे”. यावर राखी तिला “हो, मी प्लास्टिक सर्जरी केली आहे. तुला काय होतंय. तू जळतेस का माझ्यावर? माझा संपूर्ण इतिहास काढून आली आहेस. माझी ही सर्जरी झालीये, ती सर्जरी झालीये. त्यात काय आहे. तू पण कर”, असं उत्तर देते.अपूर्वा यावर पुढे म्हणते, “मी तुझा इतिहास वगैरे काढून आले नाही. राखी मी खरंच तुझी फॅन होते. पण आता तुला हे सगळं करताना बघून मला खूप त्रास झाला”. त्यानंतरही राखीने घरात खूप ड्रामा केल्याचं पाहायला मिळालं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने