सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांचे मविआ सरकारवर गंभीर आरोप

पटना : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याचे आदेश शिंदे-फडणवीस सरकारनं दिले आहेत. यावरुन हिवाळी अधिवेशनात मोठा गोंधळ सुरु होता. या वादात आता दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी देखील उडी घेतली आहे. या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी मागल्या महाविकास आघाडी सरकारवरही गंभीर आरोप केला आहे. 



सुशांतचे वडील के. के. सिंह म्हणाले, "जसं मी बातम्यांमध्ये पाहिलं की दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेचं नाव येत आहे. खरं कारण एसआयटीच्या चौकशीतूनच समोर येईल. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी"राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करताना सिंह म्हणाले, "हे यापूर्वीच व्हायला हवं होतं, परंतू त्यावेळी सरकार दुसरं होतं त्यामुळं हे होऊ शकलं नाही. आत्ताच्या सरकारनं घेतलेला निर्णय योग्य आहे. गेल्या सरकारमध्ये चौकशी योग्य प्रकारे यामुळं झाली नाही कारण या प्रकरणात तेच लोक यामध्ये सामिल होते"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने