रणबीर-श्रध्दा कपूरच्या नव्या चित्रपटाची झलक आली समोर; शीर्षक आहे एकदमच हटके

मुंबई : ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर आता लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून तो पहिल्यांदाच अभिनेत्री श्रद्धा कपूरबरोबर झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाची झलक प्रदर्शित झाली असून सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.रणबीर श्राद्धाच्या या चित्रपटाची घोषणा झाली होती मात्र चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नव्हते. अखेर त्यांनी चित्रपटाची झलक दाखवत हे नाव जाहीर केले आहे. पोस्टरवर ‘TJMM’ असे लिहिले होते. दिग्दर्शक लव रंजन यांनी चित्रपटाचे नाव जाहीर केले असून ‘तू झुठी मैं मक्कार ‘असे या चित्रपटाचे नाव आहे.




या चित्रपटाचा टीझरही समोर आला आहे, ज्यामध्ये रणबीर आणि श्रद्धाची केमिस्ट्री चांगलीच पाहायला मिळत आहे. टीझर पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. त्याच वेळी, या चित्रपटाचे शीर्षक देखील खूप मजेदार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी मसाला चित्रपट आहे असे दिसत आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होईलचित्रपटाचे दिग्दर्शक लव्ह रंजन याने ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यासारखे चित्रपट दिले आहेत जे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. आता चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील दोन स्टार किड्स यात काम करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने