नार्को टेस्टमध्ये आफताबला विचारले 'हे' प्रश्न; 'त्या' सहा महिन्यांमध्ये नेमकं काय घडलं?

नवी दिल्लीः श्रद्धा खून प्रकरणाध्ये आज आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्यात आली. या दरम्यान आफताबला महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. श्रद्धाचा खून केल्यानंतरच्या सहा महिन्यांमध्ये नेमकं काय झालं? असा प्रश्न आफतबला यावेळी विचारण्यात आला.



आफताबला विचारलेले काही प्रश्न

१. श्रद्धाचा खून कोणत्या तारखेला केला?

२. श्रध्दाला का मारलं?

३. श्रद्धाला कसं मारलं?

४. मृतदेहाचे तुकडे कसे केले?

५. तुकडे करण्यासाठी हत्यार कुठून घेतले?

६. तुकड्यांना घरामध्ये किती काळ ठेवलं?

७. तुकड्यांना कसं आणि कुठं ठेवलं?

८. मृतदेहाच्या तुकड्यांची कुठे-कुठे विल्हेवाट लावली?

९. हत्यार कुठे फेकले?

१०. हत्येनंतर सहा महिने काय केलं?

११. रागाच्या भरामध्ये खून केला तर पोलिसांपुढे सरेंडर का नाही केलं?


इंग्रजीमध्ये दिली उत्तरं

नार्को टेस्टदरम्यान आफताबने अनेक प्रश्नांची उत्तरं इग्रजी भाषेमध्ये दिली आहेत. काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्याने वेळ घेतला तर काही प्रश्नांची उत्तरं त्याने दिली नाहीत. मात्र त्याला वारंवार तेच प्रश्न विचारल्याने त्याने उत्तरं दिली. नार्को टेस्टनंतर पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्याचं सांगितलं जातंय.दिल्लीतल्या भीमराव आंबेडकर रुग्णालयामध्ये आज आफताब पूनावालाची नार्को टेस्ट झाली. यावेळी या प्रकरणाशी संबंधित अधिकारी, तज्ज्ञ यांची टीम उपस्थित होती. तब्बल दोन तास ही टेस्ट सुरु होती. आफताबने जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं दिल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने