छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षयला पाहताच लोकांनी दिला इशारा; म्हणाले,'लक्षात ठेव..'

मुंबई : सम्राट पृथ्वीराज ही ऐतिहासिक भूमिका साकारल्या नंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या भूमिकेसाठी अक्षयनं कसून तयारी केली आहे. त्यात मराठी सिनेमात अक्षय दिसणार असल्यामुळे एक वेगळीच उत्सुकता पहायला मिळत आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' मध्ये अक्षय कुमार आपल्याला दिसणार आहे,या सिनेमाच्या माध्यमातून त्यानं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. सिनेमाच्या पहिल्या शेड्युलचं शूटिंग सुरु झालं आहे. अक्षय कुमारनं सिनेमाची पहिली झलक शेअर केली आहे.



वसीम कुरेशी यांच्या प्रॉडक्शन अंतर्गत बनत असलेल्या या सिनेमात सुवर्ण इतिसातलं एक पान म्हणजे,शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न दाखवलं जाणार आहे. बोललं जात आहे की, सिनेमात हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि त्याचा शानदार प्रवास अन् त्यासाठी निस्वार्थीपणे ज्यांनी ज्यांनी त्याग,बलिदान दिलं त्या वीरांचं स्मरण केलं जाणार आहे. अक्षयनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपली झलक शेअर करत लिहिलं आहे की,''जय भवानी,जय शिवाजी!''अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,''आज मराठी सिनेमा 'वेडात मराठे वीर दौडले सात' चे शूटिंग सुरु करत आहे. ज्यात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाली हे माझं भाग्य समजतो. शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासापासून मी प्रेरणा घेत आणि मॉं जिजाऊ यांच्या आशीर्वादानं मी या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न करेन. तुमचा आशीर्वाद कायम राहू दे''. यावर अनेक चाहत्यांनी अक्षयला या सिनेमासाठी पाठिंबा दिला आहे तर काहींनी शुभेच्छा दिल्यात,तर काही लोकांनी मात्र अक्षयला भूमिकेसंदर्भात इशारा दिला आहे.

एका नेटकऱ्यानं तर स्पष्टपणे म्हटलं आहे की,'हा महाराष्ट्र आहे भावा,इथे चूकीसाठी माफी नाही,त्यामुळे नीट लक्षपूर्वक काम कर'. दुसऱ्या एकानं लिहिलं आहे,'बस्स...फक्त शिवाजी महाराजांच्या भूमिकेत परफेक्ट शोभून दिसू दे तू..नाहीतर पृथ्वीराज सारखी अवस्था होईल'. आणखी एक जण म्हणाला आहे,'पृथ्वीराज सिनेमात जे केलंस तसं पुन्हा नको करूस प्लीज'. तर एकानं तर धमकी देत लिहिलं आहे,'शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यात चूक केलीस तर लक्षात ठेव...'.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने