नवीन वर्ष अन् नवे नेते; घोटाळे बाहेर काढणार म्हणत सोमय्यांनी निवडली नावं!

मुंबई: 2022 वर्ष सरत असतानाच लोक नवनवे संकल्प करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. याचपार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केले आहेत. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावं जाहीर केली आहेत.



याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. नव्या वर्षात नवे घोटाळे बाहेर काढणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी जाहीर केलं आहे. याबाबतचं ट्विट करत त्यांनी 5 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं साई रिसॉर्ट प्रकरणही किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर असणार आहे. यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले. अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा, SRA च्या घरांमधील घोटाळा या गोष्टी नव्या वर्षामध्ये आपल्या निशाण्यावर असतील असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने