सीमावाद सुरु असतानाच कर्नाटकात माजी मंत्र्याचा भाजपला धक्का; नव्या पक्षाची केली स्थापना!

 बंगळुरु : सध्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद  सुरु असतानाच माजी मंत्र्यानं भाजपला जोरदार दणका दिला आहे. कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका  पार पडणार आहेत. या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय.कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि खाण व्यावसायिक जी. जनार्दन रेड्डी यांनी भाजपला रामराम करत नवा पक्ष स्थापन केलाय. धर्म, जात आणि फुटीरवादी राजकारणाविरोधात लढणार असल्याचं सांगत त्यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय.



गेल्या दोन दशकांपासून जी. जनार्दन रेड्डी हे भाजपमध्ये होते. मात्र, आता त्यांनी भाजपपासून वेगळं होत नवीन पक्षाची स्थापना केलीये. ‘कल्याण राज्य प्रगती पक्ष’ असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. नवीन पक्षाची स्थापना करताना रेड्डींनी आपण गंगावती विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढणार असल्याचंही जाहीर केलं. दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या अवैध खाणकाम प्रकरणी रेड्डी हे 2015 पासून जामिनावर आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने