नरेंद्र मोदी पुन्हा जुन्या अवतारामध्ये; देशात मास्क सक्तीची दाट शक्यता

नवी दिल्लीः चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाने रौद्र रुप धारण केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतानेही खबरदारी घेण्यास सुरुवात केलेली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाची बैठक घेणार आहेत.चीनसह जपान, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. रोज हजारो आकडे निष्पन्न होत आहेत. भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोना लसीकरणामध्ये देशात इम्युनिटीचं कडं तयार झालं असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.



आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा हिवाळी अधिवेशनासाठी संसदेत पोहोचले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यांच्यासह राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेचे अध्यक्ष यांनीही मास्क परिधान केला होता. काल जेव्हा आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली तेव्हा तेही मास्कमध्येच होते.एकूनच केंद्र सरकार कोरोनाच्या बाबतीत सतर्क असल्याचं दिसून येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक उच्चस्तरीच बैठक घेत आहेत. या बैठीकत मास्कसक्ती होऊ शकते, असा अंदाज आहे. मोदी पुन्हा कोरोना काळातल्या अवतारामध्ये दिसून आल्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

चीनमध्ये पुन्हा करोनाचे थैमान सुरू झाले आहे. Omicron उप-प्रकार BF.7 ची किमान चार प्रकरणे भारतातही आढळली आहेत. परंतु आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असे भारतीय सरकारचे म्हणणे आहे. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी राज्यांना नमुने पाठवण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोविडचे प्रकार ओळखण्यास मदत होईल.आतापर्यंत, गुजरातमधून दोन, ओडिशातून दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.या प्रकरणांत BF.7 व्हेरियंट आढळून आला आहे. यूएस आणि यूके आणि बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन राष्ट्रांसह इतर अनेक देशांमध्ये हे आधीच आढळले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने