नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच होणार हे पाच मोठे बदल, सरकार देणार मोठा झटका

मुंबई: या वर्षाचे काहीच दिवस शिल्लक आहे आणि आता सर्वांना नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. 2023 चे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक आहे. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काही नियमांमध्ये मोठे बदल होणार आहे. यामध्ये पाच मोठे बदल असणार त्यात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीपासून बँक लॉकर पर्यंतच्या सर्व नियमांचा समावेश आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

GST Invoicing चे नियम
जीएसटी ई-इन्वॉयसिंग (GST Invoicing) या इलेक्ट्रॉनिक बिलचे नियम 1 जानेवारी 2023 बदलणार आहे. सरकारने ई-इन्वॉयसिंगसाठी 20 कोटी रुपयांच्या लिमिटेशनला कमी केले असून आता पाच कोटी रुपये केले आहे. हा नियम एक जानेवारीपासून लागू होणार. हा नियम लागू झाल्यानंतर आता वार्षिक पाच कोटी नफा मिळवणाऱ्या व्यावसायिकांना इलेक्ट्रॉनिक बिल जनरेट करणे गरजेचे राहणार.



Bank Locker चे नियम
भारतीय रिझर्व्ह बँकतर्फे जारी केलेल्या निर्देशानुसार, एक जनवरी 2023 पासून बँक लॉकर  च्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या नियमाअंतर्गत बँकाना मोठा फटका बसणार आहे. लॉकर प्रति बॅंकांची जबाबदारी वाढवण्यात आलेली आहे.जर लॉकरमधील ग्राहकांच्या कोणत्याही सामानचे नुकसान झाले तर यासाठी बँक जबाबदार राहणार. ग्राहकांना बँकेसोबत 31 डिसेंबर पर्यंत अॅग्रीमेंट साइन करायचा आहे ज्यामुळे ग्राहकांना लॉकरचे बदलल्या नियमांविषयी SMS द्वारे माहिती दिली जाणार.

Vehicle खरेदी महागणार
जर तुम्ही नवीन वर्षात नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर कदाचित तुमचा जास्तीचा पैसा जाऊ शकतो. कारण 2023 मध्ये Maruti Suzuki, MG Motors, Hyundai, Reno पासून Audi आणि Mercedese सारख्या कंपन्या आपल्या वाहनांची किंमत वाढवत आहे. टाटाने तर त्यांच्या कॉर्मशियल गाड्यांच्या किमती जानेवरी 2023 पासून वाढवण्याची आधीच सांगितले होते.

LPG-CNG-PNG चे भाव
नवीन वर्षाच्या सुरवातीला LPG Cylinder-CNG-PNG ची किमतींना घेऊन सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. खरं तर तेल-गॅस कंपन्याचे भाव प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला जाहीर केले जाते. मात्र नवीन वर्षात सरकारकडून सामान्य जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीला घेऊन घट दिसू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने