राज्यपाल कोश्यारी यांचं पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..."

पुणे: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या विधानांवरुन ते वाद ओढवून घेत आहेत. मात्र आता त्यांच्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यपाल पुण्यातील डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्यात उपस्थित झाले होते.त्यावेळी त्यांनी एक विधान केलं ते म्हणाले की, "मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, कोश्यारी यांनी असं वक्तव्य केलं. राज्यपाल यांचे भाषण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या समोरीच्या बाजूला व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्याच्या व्यक्तीच्या मागे एक महिला बसली होती.



त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे महिलेने राज्यपालांना दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, "तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे" असा मिश्किलपणे प्रश्न विचारताच सभागृहात एकच हशा पिकला.तर पुढे म्हणाले "मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ" तुम्ही जसे बोलणार तसे मी करणार, तुम्ही बोला’ असं वक्तव्य राज्यपालांनी केलं. या वक्तव्याने सभागृहात चांगलाच हशा पिकला. मात्र राज्यापालंच हे वक्तव्य सुचक आहे. अशी चर्ची आता सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने