'फुले-शाहू-आंबेडकर' हा विचार... मग शिवाजी महाराजांचे 'विचार' नाहीत का? ठाकरेंनी पवारांना छेडलं

मुंबईः राज ठाकरेंचा कोकण दौरा सुरु आहे. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'वीर दौडले सात' या चित्रपटाबद्दलही त्यांनी मत व्यक्त केलं. सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावीच लागते. आपण फक्त महारापुरुषांना जातीच्या चष्म्यातून पाहाणं चुकीचं आहे, असं राज म्हणाले.'जात' या मुद्द्यावर बोलतांना राज ठाकरेंनी पुन्हा शरद पवारांना टार्गेट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ साली झाली तेव्हापासूनच राज्यात जातीचं राजकारण सुरु झाल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. ते म्हणाले की, शरद पवार तेव्हा कधीच शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाहीत. 'फुले-शाहू-आंबेडकर' हा विचार आहे, असं पवार सांगतात. मग 'शिवाजी महाराज' हा विचार नव्हता का? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला.



''मूळ विचार हा शिवरायांचा आहे. परंतु शिवरायांचं नाव घेतलं की मुस्लिम मतं जातात, म्हणून नाव घेणं जाळलं जातं. इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडायची म्हणजे हेही खिशात आणि तेही खिशात'' असं राजकारण केल्याचं ठाकरेंनी सांगितलं.कालपासून राज ठाकरेंचा कोकण दौरा सुरु आहे. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केलीय. कोकण दौऱ्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांशी गाठीभेटी, तेथील प्रश्न समजून घेणं आणि जनतेशी संवाद साधला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने