बाबरचाही विराट कोहली होणार; पाकिस्तान भारतातीच कॉपी करणार

 मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. तसं पाहिलं तर पाकिस्तानी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर त्याना सलग चार कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडपूर्वी पाकिस्तानलाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.



माजी पाकिस्तानी क्रिकेटर रमीझ राजाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षपदावरून बुधवारी हटवण्यात आले. आता पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक हेही आपले पद सोडू शकतात. त्याचबरोबर बाबर आझमला कसोटी कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. पीसीबीच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, माजी ऑफस्पिनर सकलेन न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर पद सोडू शकतो.पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्या गद्दाफी स्टेडियममधील कार्यालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम देखील सहभागी झाला होता. सूत्राने सांगितले की बाबर, सकलेन आणि वसीम यांनी राजाला सांगितले की पाकिस्तानचा कसोटी मालिका का पराभव झाला. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत संघातील प्रत्येक पैलू, निवडीचे मुद्दे, कर्णधारपद आणि सकलेनची भूमिका यावर चर्चा झाली.

सूत्राने सांगितले की, बोर्डाला असेही वाटते की बाबरने केवळ मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व करावे आणि कसोटी फॉरमॅटचे कर्णधारपद शान मसूद किंवा मोहम्मद रिझवानकडे सोपवले जावे. यावरून असे दिसत आहे की बाबरचा पण विराट होत आहे. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी कर्णधारपद सोडले होते. टीम इंडियाने कसोटी मालिका 1-2 ने गमावली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने