दरवर्षी घरदार सोडून लाखो लोकांना का करावं लागतं स्थलांतर?

मुंबई : कोरोना अद्यापही संपलेला नाही. या वर्षात अनेक महत्त्वाच्या घडामोडी दिसून आल्या. त्यात रशिया युक्रेन युद्ध असो की Climate Change असो कधी कुठे भुकंप तर कुठे नवनवीन आजार. पण यासर्वांचा प्रभाव स्थलांतरावर होतो.आज आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिवस आहे. यानिमित्त्याने आपण स्थलांतराविषयी अधिक पैलू जाणून घेऊया. स्थलांतराचे कारणे, त्यामुळे होणारा परिणाम, इत्यादी गोष्टींविषयी जाणून घ्या. 



स्थलांतरण करणारे कोण आहेत?

युद्ध, असुरक्षा, क्लायमेट चेंज, रोजगार या सारख्या गंभीर समस्येमुळे अनेक लोक आपली रहीवासी जागा सोडून दूसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत होतात. पण जेव्हा ते दुसऱ्या ठिकाणी पोहचतात त्यावेळी त्या ठिकाणचे लोकांना ते ओझं वाटू लागतात.2021 मध्ये जवळपास 5.9 कोटी लोकं स्थलांतरीत झाले होते मात्र हे लोकं कोण होते, हे समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. हे लोक ते होते की आपला देश सोडत दुसऱ्या देशात स्थलांतरीत झाले किंवा बॉर्डर पार करुन दुसऱ्या देशाच्या बॉर्डरवर राहायला गेले.कोरोना काळात अनेकांचा रोजगार दगावला. त्यामुळे अनेकांनी स्थलांतर केले. मोठ्या शहरातून लोक गावाकडे परतले. याशिवाय कोरोनाचा धोका संपताच लोक पून्हा शहराकडे स्थलांतरीत होताना दिसत आहे.

कारणे

स्थलांतर हे स्थायी आणि अस्थायी असं दोन्हीही असू शकतं. यामागे अनेक कारणे आहेत. युद्ध किंवा क्लायमेट चेंजसारखे कारणे तर आहे मात्र याव्यतिरीक्त अनेक कारणांमुळे लोकांनी स्थलांतरीत केले आहे.रोजगारीच्या शोधात असलेले काम असो की मानव तस्करीत झालेले स्थलांतर किंवा गैरकायद्याने करणारे स्थलांतर, असे अनेक कारणे आहेत.आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या मते प्रत्येक तीस व्यक्तींमध्ये एक व्यक्ती स्थलांतरीत करत असतो आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.मागील काही दशकात आंतरराष्ट्रीय स्थलांतरील लोकांचीही संख्या वाढली आहे. यासोबतच गावाकडचे लोकं शहरात स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे स्थलांतर ही एक गरज झालेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने