इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलचे दर सर्वात कमी : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी

दिल्ली : सध्या देशात इंधन दरांनी महागाईचा उच्चांक गाठला आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दराने गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चाप बसलाय. त्यामुळे प्रत्येक जण इंधन बचत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसताहेत.



मात्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, सध्याची जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती पाहता भारतातील पेट्रोलचे दर इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहेत. 2021-2022 या कालावधीत भारतात पेट्रोलच्या किंमती केवळ दोन टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र, या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर किमतीत मोठी वाढ झाली.गुरुवारी प्रश्नोत्तरा दरम्यान प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, केंद्राने उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी व्हॅट कमी केला होता, तर काही विरोधी-शासित राज्यांनी तसे केले नाही. आज, भारतातील पेट्रोलच्या किमती कदाचित सर्वात कमी आहेत.

पुरी म्हणाले, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि झारखंडने त्यांच्या करात कपात केलेली नाही. किंमत वाजवी पातळीवर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये दोनदा उत्पादन शुल्क कमी केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने