साडे चारशे वर्षापूर्वी कोरोनाची भविष्यवाणी करणारे नास्त्रेदमस कोण होते?

मुंबई: भविष्यात काय होणार, याची उत्सूकता सर्वांनाच असते. त्यामुळे अनेकजण भविष्य जाणून घेण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्र, अंक शास्त्र सारख्या अनेक गोष्टींचा वापर केला जातो पण जेव्हा जेव्हा ज्योतिषशास्त्रांचा उल्लेख केला जाईल तेव्हा तेव्हा एक नाव नेहमी समोर येईल ते म्हणजे प्रसिद्ध ज्योतिषी नास्त्रेदमस.नास्त्रेदमस जगातील प्रसिद्ध ज्योतिषी आहेत ज्यांनी आधीच जगातील मोठ्या घटनांची माहिती दिली होती आणि त्यांची भविष्यवाणी खरीही ठरली.



नास्त्रेदमस या महान फ्रेंच ज्योतिषीचा जन्म फ्रान्सच्या एका छोट्या गावात १४ डिसेंबर १५०३ ला झाला. ते ज्योतिषी सोबतच एक चांगले शिक्षक आणि उत्तम डॉक्टर होते. त्यांनी प्लेगसारख्या गंभीर आजारांवर उपचार केला. नास्त्रेदमस यांची विशेषत: म्हणजे ते भविष्यात होणाऱ्या अनेक घटनांचे आधीच त्यांच्या कवितेद्वारे करायचे.सुरवातीला त्यांच्या भविष्यवाणी चुकीच्या ठरल्या म्हणून त्यांना दोष करण्यात आला. मात्र त्यानंतर विसाव्या शतकानंतर त्यांच्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आणि त्यांची लोकप्रियता वाढत गेली.

कुठे लिहल्या होत्या नास्त्रेदमसनी या भविष्यवाण्या?

नास्त्रेदमसने या भविष्यवाण्या त्यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकात ‘द प्रोफेसीज’ मध्ये लिहल्या होत्या. नास्त्रेदमसने या पुस्तकात 950 भविष्यवाण्या लिहल्या. विशेष म्हणजे त्यांच्या भविष्यवाण्या कविता आणि विशेष कोडमध्ये असतात.

नास्त्रेदमसची सर्वात मोठी भविष्यवाणी?

नास्त्रेदमस यांनी 2020 मध्ये जगावर खूप मोठी महामारी येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. या महामारीत लाखो लोक मरतील, असे त्याने सांगितले होते आणि नास्त्रेदमसची ही भविष्यवाणी खरी ठरली. कोरोना महामारी याचं उत्तम उदाहरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने