मुंबई: कोरोनाचा प्रादूर्भाव सगळीकडे वाढत चालल्याने आता लोकांची आरोग्याविषयीची दक्षता वाढली आहे. मात्र वैद्यकिय क्षेत्रातून नागरिकांना दिलासा देणारी बातमी आता पुढे येतेय. मंगळवारी तब्बल 127 औषधांच्या किंमती ठरवण्यात आल्याची माहिती नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटीकडून देण्यात आली. यात तुमच्या रोजच्या वापरातील बऱ्याच औषधांचा समावेश आहे.
स्वस्त औषधे बाजारात कधी उपलब्ध होणार?
NPPA ने सलग या वर्षात पाचव्यांदा औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत. लवकरच नव्या स्वस्त दरातील औषधे बाजार उपलब्ध होतील. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कमी किमतीतील औषधं ही 2023 मध्ये शेवटच्या आठवड्यापासून उपलब्ध होतील. तसेच सर्वसामान्य नागरिक ही औषधे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून विकत घेऊ शकतील.
कोणती औषधे झालीत स्वस्त?
पॅरासिटामॉल - आधीची किंमत 2.3 रुपये होती आता ती 1.8 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.
अमोक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लेव्हुलेनेट - 22.3 रुपयांना विकले जाणारे अमोक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लेव्हुलेनेट 16.8 रुपये प्रति टॅबलेटमध्ये उपलब्ध असतील.
मोक्सीफ्लॉक्सासिन (400mg) 31.5 रुपयांवरुन 22.8 रुपये प्रति टॅबलेटवर कमी करण्यात आले आहे.