चार वेळा प्रेमात पडूनही रतन टाटांनी आयुष्यभर अविवाहीत राहण्याचा निश्चय केला!

मुंबई: जगातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. रतन टाटा लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. इंडस्ट्रीतल्या यशासाठी ते ओळखले जातातच पण त्याचं व्यक्तिमत्त्वही पूर्णपणे वेगळे आहे. रतन टाटा चार वेळा प्रेमात पडले, पण त्यांनी कधीच लग्न केले नाही.टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी कधीही कोणाशी लग्न केले नाही. पण, याचा अर्थ असा नाही की, त्यांनी कधी कुणावर प्रेम केले नाही. एका मुलाखतीत खुद्द रतन टाटा यांनी आपल्या लव्ह लाइफबद्दल सांगितले होते. खरतर ते एकदा नव्हे तर चार चार वेळा प्रेमात पडले होते. पण, खऱ्या प्रेमाची पारख कठिण काळातच होते. तसेच त्यांच्याबाबतीतही झाले. त्यामूळेच त्यांनी अविवाहीत राहण्याचा निश्चय केला.



रतन टाटा पहिल्यांदा प्रेमात पडले होते. पण, ते त्यांचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. ते अमेरिकेत शिक्षण घेत होते तेव्हा तिथल्याच एका तरूणीच्या प्रेमात पडले होते. तिच्याशी लग्न करण्याचा त्यांचा निश्चय पक्का होता. पण, त्यांच्या आजीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना भारतात परतावे लागले.लहानपणीच आई वडीलांचे छत्र हरवलेल्या रतलजींना आजीचाच आधार होता. त्यामुळे कोणताही विचार न करता ते भारतात परतले. त्यांना पाहून आजीच्या तब्बेतीत हळूहळू सुधारणा झाली. त्यावेळी त्यांना अमेरिकेतील मैत्रिणीची आठवण आली. त्यांनी तिला पत्र लिहून भारतात ये आपण लग्न करून सेटल होऊ असे सांगितले. मात्र ती तिचे पालक या गोष्टीला तयार नव्हते. त्याकाळात भारत चीन युद्ध सुरू होते. त्यामूळे तिला भारतात पाठवणे त्यांना मंजूर नव्हते. तिच्या पालकांनी तरूणीचे लग्न अमेरिकेतीलच एका मुलाशी लावले.

या एका प्रेमभंगानंतरही टाटा पुन्हा तीनवेळा प्रेमात पडले होते. पण, तेही प्रेम यशस्वी होऊ शकले नाही. याबद्दल टाटा सांगतात की, अविवाहित राहणे माझ्यासाठी फायदेशीर आहे. मीही लग्नाच्या बेडीत अडकलो असतो तर यशस्वी होणं इतकं सोपं झालं नसतं. मी कोणत्या ना कोणत्या गुंत्यात अकडत गेलो असतो.रतन टाटा यांना विमाने उडवण्याचा आणि पियानो वाजवण्याचाही छंद आहे. निवृत्तीनंतर टाटा म्हणाले होते की, आता मला माझे आयुष्यभर छंद पूर्ण करायचे आहेत. आता मी पियानो वाजवणार आणि विमान उडवण्याचा माझा छंद पूर्ण करेन.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने