निर्माते घाबरले की काय? अब्दू शोमध्ये परत येणार....

मुंबई: हिदीं रियॅलिटी शोमध्ये सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस आता अंतिम टप्प्यात पोहचला पण वाढती लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी हा शो आणखी काही दिवस वाढवला आहे. मात्र गेल्याकाही दिवसांपूर्वी शो मधील लोकप्रिय स्पर्धक अब्दु रोजिक याला शोमधून काढून टाकण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी एकच राडा केला होता.अब्दु नाही तर शो पाहणार नाही अशी भूमिका प्रेक्षकांनी घेतली. त्याला काढण्यात आल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी होती. हिच नाराजी लक्षात घेता शो च्या निर्मात्यांनी अब्दुला शोमध्ये पुन्हा घेण्याचा विचार केला आहे.



अब्दु रोजिकला बिग बॉस 16 मध्ये प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. लोक त्याची निरागसता प्रेक्षकांना मोहित करते. अलीकडे, जेव्हा अब्दू एक टास्क पूर्ण करण्यासाठी शोच्या बाहेर गेला तेव्हा कुटुंबातील सदस्यांना तसेच चाहत्यांना त्याची खूप आठवण आली. सोशल मीडियावर अब्दूला शोमध्ये परत आणण्याची मागणी होत होती. आता अब्दू परत आल्याने चाहत्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे.माहितीनुसार, अब्दू रोजिक बिग बॉस 16 मध्ये परतला आहे आणि सध्या घरामध्ये आहे. त्याची झलक वीकेंड का वारमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याला पाहून घरातील सदस्यांच्या आनंदाला उधान येणार आहे. खंर ठाकरे आणि एमसी स्टॅन खूप खुश आहेत. मात्र त्याच बरोबर अब्दु जानेवारीत शो सोडणार आहे.अब्दू रोजिकशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे की, तो काही दिवसांसाठीच शोमध्ये आला आहे. कामाच्या कमिटमेंटमुळे त्याला जानेवारी महिन्यातच शो सोडावा लागणार आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने