आता 15 वर्षांच्या मुस्लिम मुलीला आवडत्या मुलाशी करता येणार लग्न; High Court चा मोठा निर्णय

झारखंड: 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुस्लिम मुलींना  त्यांच्या पालकांच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे, असं झारखंड उच्च न्यायालयानं  मुस्लिम कायद्याचा हवाला देत म्हटलंय.आपल्या समुदायातील 15 वर्षांच्या मुलीशी विवाह करणाऱ्या मुस्लिम तरुणाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे फौजदारी कारवाई रद्द करताना न्यायालयानं हे सांगितलं. एफआयआरमध्ये बिहारच्या नवादा येथील रहिवासी 24 वर्षीय मोहम्मद सोनूवर झारखंडच्या जमशेदपूरमधील जुगसलाईतील 15 वर्षीय मुस्लिम मुलीला लग्नाचं  आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप आहे.



सोनूनं मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे फौजदारी कारवाईला न्यायालयात आव्हान दिलं आणि झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सुनावणीदरम्यान मुलीच्या वडिलांनी आपला लग्नाला विरोध नसल्याचं सांगितलं. आपल्या मुलीसाठी योग्य पतीचा शोध पूर्ण केल्याबद्दल अल्लाहचे आभार मानत मुलीच्या वडिलांनी कोर्टात स्पष्ट केलं की, काही गैरसमजामुळं मी मोहम्मद सोनू विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.वास्तविक, मुलीच्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलानंही कोर्टाला सांगितलं की, दोन्ही कुटुंबांनी लग्नाला होकार दिला आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती एस. द्विवेदी यांच्या खंडपीठानं सोनूविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले. मुलीच्या वडिलांनी सोनूविरुद्ध आयपीसी कलम 366A आणि 120B अंतर्गत एफआयआर दाखल केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने