नोटेवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवा; गांधीजींच्या नातेवाईकांची मागणी

मुंबई : महात्मा गांधी यांची नोटेवरची प्रतिमा काढून टाका, अशी मागणी गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केली आहे. तसंच त्यांनी भारत सरकारवर खोचक टीका केली आहे.महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी ही टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये तुषार गांधी म्हणतात, नव्याने आणलेल्या डिजिटल करन्सीमध्ये बापूंची प्रतिमा समाविष्ट न केल्याबद्दल रिझर्व बँक आणि भारत सरकारचे आभार. आता कृपया नोटांवरुनही त्यांची प्रतिमा काढून टाका.




कोण आहेत तुषार गांधी?

तुषार गांधी हे महात्मा गांधी यांचे पणतू आहे. महात्मा गांधींचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचे ते चिरंजीव आहेत. लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी लेट्स किल गांधी हे पुस्तक लिहिलं होतं, हे बेस्ट सेलर पुस्तक ठरलं. याशिवाय, द लॉस्ट डायरी ऑफ कस्तूर माई बा, हे पुस्तकही लिहिलं आहे. त्यांनी कमल हसन दिग्दर्शित बॉलिवूड फिल्स हे राम मध्ये काम केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने