नवीन वर्षात फक्त ५००० रुपयांत सुरू करा हा व्यवसाय आणि भरघोस कमवा

मुंबई: सिंगल यूज प्लास्टिकच्या व्यवसायाशी बरेच लोक जोडलेले आहेत. आता त्यावर पुर्णपणे निर्बंध घालण्यता येत आहे. त्यामुळे या लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी काही बिझनेस आयडिया देत आहोत. ज्यात तुम्हाला फार कमी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे.मातीची भांडी, कुंभारवाडा इथल्या व्यवसायाला यामुळे चालना मिळणार आहे. यूज अँड थ्रो प्लास्टिक वस्तूंना पर्याय म्हणून मातीच्या कुल्लडचा व्यवसाय सुरू करता येइल. यासाठी फक्त ५००० रुपये गुंतवून सुरूवात करता येईल. चहाच्या प्लास्टिक कपांना पर्याय म्हणून याची मोठी मागणी आहे. त्यामुळे कमी खर्चात सुरू होणाऱ्या या उत्पादनाला मागणी मोठी




केंद्र सरकार करणार मदत

यासाठी सरकार वीजेवर चालणारं चाक व्यावसायिकांना देतात. शिवाय हे कुल्लड चांगल्या किंमतीला खरेदी पण करतात.

कच्चा माल

  • यासाठी सर्वात मुख्य कच्चा माल म्हणजे चांगल्या प्रतीची माती आवश्यक आहे. ती नदी किंवा तलावात मिळते.

  • साचा आवश्यक असतो. तो कोणत्याही बाजारात उपलब्ध असतो.

  • कुल्लड बनवल्यानंतर भट्टीत भाजतात, त्यासाठी भट्टीची आवश्यकता असते.

किती कमाई होणार?

  • कुल्लड सर्वात स्वस्त आणि पर्यावरण पुरक असतो. सध्याचा दर चहाचं कुल्लड ५० रुपये शेकडा आहे.

  • लस्सीचा कुल्लड १५० रुपये शेकडा.

  • पाण्याचा कुल्लड १०० रुपये शेकडा.

  • संपूर्ण प्लास्टिक बंद होऊन मागणी वाढेल तसा अजून चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने