राहुल गांधी बनले सँटाक्लॉज; भारत जोडो यात्रेत वाटली खास गिफ्ट्स

नवी दिल्ली : देशभरात सध्या ख्रिसमसचा मोठा उत्साह असून याच काळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली 'भारत जोडो यात्रा' दिल्लीत दाखल झाली आहे. या यात्रेत राहुल गांधी आपल्या समर्थकांसाठी सँटाक्लॉज बनले अन् त्यांनी गिफ्ट्सही वाटली.

भारत जोडो यात्रा शनिवारी हरयाणाच्या बदरपूर बॉर्डरवरुन दिल्लीत दाखल झाली. या ठिकाणाहून सकाळी ६ वाजता या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत राहुल गांधी एक तास चाळीस मिनिटात आठ किमीचं अंतर पार केलं. त्यानंतर न्यू फ्रेन्ड्स कॉलनी इथं ते विश्रांती घेतली. यानंतर ही यात्रा निजामुद्दीन, आईटीओ चौक, राजघाट मार्गानं संध्याकाळी ४.३० वाजता लाल किल्ल्यावर पोहोचणार आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांची जाहीर सभा देखील होणार आहे.



दिल्ली भारत जोडो यात्रेचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल वाजवून स्वागताला कार्यकर्ते हजर होते. दिल्लीत कडाक्याची थंडी असतानाही सकाली या यात्रेत मोठी गर्दी दिसून आली.दरम्यान, सध्या दिल्लीतही ख्रिसमसचा माहौल आहे, त्यामुळं राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि समर्थकांसाठी सँटाक्लॉज बनले आणि त्यांना काही गिफ्ट्सही वाटली. या गिफ्ट्समध्ये चॉकलेट्स आणि टॉफीजचा समावेश होता. या यात्रेत काही शाळेची मुलंही सहभागी झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने