टी-शर्ट काढून झाला उघडा, शेवटी... ब्राझील विरुद्ध गोल करणाऱ्याला दणका

कतार : फिफा विश्वचषक 2022 च्या शेवटच्या गट सामन्यात मोठा अपसेट पाहिला मिळाला. येथे कॅमेरूनने ब्राझीलचा रोमहर्षक पराभव केला. संपूर्ण 90 मिनिटे 0-0 अशी बरोबरी असताना दुखापतीच्या वेळेत (90+2 मिनिटे) गोल करण्यात आला. कॅमेरूनच्या अबुबाकरने हा गोल केला. या गोलच्या जोरावर कॅमेरूनने ब्राझीलवर 1-0 असा विजय मिळवला. मात्र, या मोठ्या विजयानंतरही कॅमेरोनियन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.



रात्री झालेल्या सामन्यात गोल करणारा अबुबेकरने जल्लोषाच्या नादात अंगातील टी शर्ट काढून हवेत फिरविला आणि त्याच क्षणी पंचांनी त्याला रेड कार्ड दाखवत मैदानाबाहेरचा रस्ता दाखविला. बलाढ्य ब्राझीलला पराभूत केल्यानंतर कॅमेरूनने इतिहास रचला. फिफा विश्वचषकात ब्राझीलला पराभूत करणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला. उत्तरार्धात ब्राझीलच्या गोलपोस्टवर सतत धडका देणाऱ्या कॅमेरूनला अगदी 90 व्या मिनिटाला गोल करण्यात यश आले. उजव्या बगलेतून चेंडू घेऊन सुसाट सुटलेल्या नोगम बँकलीने उंचावर थेट डीच्या मध्यभागी पास दिला. ब्राझीलच्या तीन रक्षकांमध्ये घुसत अबुबेकरने त्यांच्या देशासाठी संस्मरणीय गोल गेला आणि तोच त्यांच्या विजयासाठी पुरेसा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने