सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात मॉर्निंग वॉकला निघालेले अग्निहोत्री ट्रोल, लोक म्हणू लागले...

मुंबई: 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अग्निहोत्री मॉर्निंग वॉकला निघालेले दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा आहे.त्या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे की, काश्मिरी पंडितांची हत्या आणि पलायनवाद यावर आधारित सिनेमा बनवण्याची किंमत त्यांना मोजावी लागली आहे. मात्र सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्रींच्या या व्हिडीओला ट्रोल केलं जात आहे.व्हिडीओला ट्वीटरवर शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे की,''काश्मिरमध्ये घडलेला हिंदूंचा नरसंहार लोकांसमोर आणण्याची किंमत मी आता मोजतोय. ज्या देशात हिंदू मोठ्या संख्येने राहतात ,तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण उपभोगतोय का?''. विवेक या व्हिडीओत काळ्या रंगाच्या ट्रॅक सूटमध्ये दिसत आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा ग्रुप दिसत आहे.



या व्हिडीओला ट्वीटरवर जोरदार ट्रोल केले जात आहे. अग्निहोत्रींच्या एका फॉलोअरनं लिहिलं आहे की,'ओह..माय टॅक्स मनी..' आणि आणखी एकानं लिहिलं आहे की, 'कर वेळेत भरणाऱ्यांच्या पैशाची अशी बर्बादी सुरु आहे तर...' ,कुणीतरी तर थेट म्हटलंय की,'आमच्या टॅक्सच्या पैशानी सुरक्षा उपभोगतायत'. तर एकानं अग्निहोत्री आपल्या व्हाय प्लस सुरक्षेचा दिखावा करत आहेत असा दावा केलाय.२०२२ मार्चमध्ये विवेक अग्निहोत्रींचा सिनेमा 'द काश्मिर फाईल्स' रिलीज झाल्यानंतर त्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती,ज्यात चार ते पाच कमांडोंचा समावेश आहे. 'द काश्मिर फाईल्स'ने जगभरात ३४० करोडचं कलेक्शन केलं होतं. या वर्षातील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या बॉलीवूडच्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. मिथुन चक्रवर्ती,अनुपम खेर,दर्शन कुमार,पल्लवी जोशी,चिन्मय मांडलेकर,भाषा सुम्बली असे कलाकार या सिनेमात होते.माहितीसाठी थोडं इथे नमूद करतो की, अग्निहोत्रींनी आपल्या आगामी 'वॅक्सीन वॉर' सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी शूटिंगची घोषणा करताना स्क्रीनप्ले आणि क्लॅप बोर्डचा एक फोटो शेअर केला होता. हा सिनेमा पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनी ११ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने