एकनाथ शिंदे भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

 मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे हे भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. पटोले यांच्या या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.पटोले म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे लोक वारंवार वादग्रस्त विधानं करत आहेत. त्यामुळं महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आणि भाजपला पाठिंबा देणारे किंवा भाजपत असलेले खासदार आणि आमदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत कारण ते मोठ्या भय आणि भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले आहेत"




कारण एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा गवगवा करायचा आणि एकीकडं भाजपनं त्यांना अपमानित करत असेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही ही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका आहे. कॉंग्रेस पक्षाची तर आहेच पण महाराष्ट्राची आहे, ही स्पष्ट भूमिका मी मांडतो आहे, असंही यावेळी नाना पटोले म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने