IND vs SL : निवडसमितीने दिला शॉक! 'या' 5 धक्कादायक निर्णयाने चाहते हादरूनच गेले

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाला श्रीलंकेशी सामना करायची आहे. दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय आणि तितके टी-20 सामने खेळल्या जाणार आहे. मंगळवारी संघाची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये निवडकर्त्यांनी अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले. अष्टपैलू हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून कायम राहील आहे. एकदिवसीय संघातही पांड्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर गेल्या वर्षी चमकदार कामगिरी करणारा सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा उपकर्णधार करण्यात आला आहे.



  • विराट आणि रोहित टी-20 मधून बाहेर :

    विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल हे टी-20 संघात नाहीत. 2024 टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून विराट, राहुल आणि रोहित यांची या फॉरमॅटमध्ये निवडही होऊ शकत नाही, असे संकेत आहेत.

  • हार्दिक पांड्या टी-20 कर्णधार :

    अष्टपैलू हार्दिक पंड्याला श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून कायम राहील आहे. तर सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा उपकर्णधार करण्यात आले आहे.

  • हार्दिक वनडेमध्ये उपकर्णधार :

    केएल राहुल एकदिवसीय संघात असूनही हार्दिक पांड्याला उपकर्णधार करण्यात आले आहे. हे देखील भविष्याचे संकेत आहेत. रोहितच्या फेज आऊटनंतर फक्त हार्दिककडेच संघाची कमान सोपवली जाऊ शकते.

  • शिखर धवन बाहेर :

    शिखर धवनचा पुढचा मार्ग आता खूपच कठीण दिसत आहे. बांगलादेशातील खराब कामगिरीनंतर त्याला आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळत नाही.

  • भुवनेश्वर कुमार दोन्ही संघातून बाहेर :

    भुवनेश्वर कुमारला दोन्ही संघात स्थान मिळू शकले नाही. निवडकर्त्यांनी त्याला एकदिवसीय आणि टी-20 या दोन्ही संघातून बाहेर ठेवले आहे. दोन्ही संघात उमरान मलिकचा समावेश करण्यात आला आहे.

  • टी-20 संघ :

    हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

  • एकदिवसीय संघ :

    रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने