आर्याचे नेमबाजीत सलग दुसरे सुवर्ण

मुंबई:  पनवेलमधील लक्ष्य शूटिंग क्लबच्या परिसरात पार पडलेल्या आरआर लक्ष्य नेमबाजी स्पर्धेमध्ये नाशिकच्या आर्या बोरसे हिने सलग दुसऱ्या वर्षी ज्युनियर गटात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. वरिष्ठ गटामध्ये ओडिशाच्या श्रीयांका सदांगी हिने बाजी मारली.ज्युनियर गटाच्या सुवर्णपदकासाठीच्या लढतीत आर्या बोरसे व पार्थ माने या दोन महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये टक्कर पाहायला मिळाली; मात्र या लढतीत आर्याने दबावाखाली अचूक वेध साधला. त्यामुळे पार्थचा १७-४ असा पराभव झाला. मध्य प्रदेशची अशी चौकसी हिने ब्राँझपदक पटकावले.






२०१६ नंतर महिला विजेती

या स्पर्धेमध्ये दोन वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धक सहभागी होत नाहीत. लक्ष्य नेमबाजी स्पर्धेमध्ये पुरुष व महिला एकत्रितपणे सहभागी होतात. यंदा वरिष्ठ गटामध्ये ओडिशाच्या श्रीयांका सदांगी हिने विजेता होण्याचा मान संपादन केला. याआधी २०१६ मध्ये महिला खेळाडूने वरिष्ठ गटात विजेता होण्याचा मान संपादन केला होता. कर्नाटकच्या मेघना सज्जनर हिने २०१६ मध्ये श्रीयांकाला हरवून स्पर्धा जिंकली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने