जवाहरलाल नेहरूंना 'हे' व्यसन होतं; केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त विधान, महात्मा गांधींवरही निशाणा

दिल्ली: अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबवणारे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी  यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय.राजस्थानमधील भरतपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, जवाहरलाल नेहरू सिगारेट ओढायचे. याशिवाय त्यांनी महात्मा गांधींचा मुलगा दारूच्या नशेत असायचा, असंही म्हटलं. केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर भरतपूरला आले होते. इथं त्यांनी नशा मुक्ती जागरण अभियान कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी त्यांनी सांगितलं की, 'जवाहरलाल नेहरू ड्रग्ज घेत असत, सिगारेटही ते ओढायचे.'



अमली पदार्थांविरोधात मोहीम राबवत असताना केंद्रीय मंत्री देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना जागरूक करण्याचं काम करत आहेत. याअंतर्गत ते भरतपूरला पोहोचले होते, तिथं त्यांनी नेहरू आणि गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी भाषणात पुढं म्हटलंय की, 'अशा प्रकारे अमली पदार्थांच्या जगानं आपल्या देशाला पूर्णपणे काबीज केलंय. आम्ही सर्वांना आवाहन करतो की, ड्रग्समुळं होणाऱ्या सर्व प्रकारच्या हानी आणि मृत्यूबद्दल लोकांना माहिती द्यावी.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने