पुण्यात MPSC करणारे विद्यार्थी रस्त्यावर; काय आहेत मागण्या?

पुणेः विविध मागण्यांसाठी आज पुण्यामध्ये एमपीएससी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्याती नवी पेठेत हे आंदोलन सुरु असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.



काय आहेत मागण्या?

राज्यसेवा पूर्व 2023 ही 4 जून रोजी आहे. त्यात लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याने पूर्व परीक्षा पास होणे आव्हानात्मक असते. म्हणून पूर्वचा किमान 5-6 महिने अभ्यास गरजेचा असल्याने वेळ मिळावा.Syllabus जसाच्या तसा UPSC चा Copy Paste आहे. MPSC च्या मुलांना अजून संदर्भसाहित्यच उपलब्ध नाही. त्यात सुधारणा व्हावी.

जुन्या 5000 मुलाखती रखडल्या आहेत. राज्यसेवा 2022 ची तर मुख्यही झालेली नाही, त्यांच्या मुलाखती व्हायला April- May महिना यायचा मग त्यांनी अभ्यास कधी आणि कशातून करायचा असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे.पुण्यातील नवी पेठेत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही, फक्त त्यासाठी तयारी करायला पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.नवीन पॅटर्न 2025 ला लागू केला तर जुन्या पद्धतीने अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना शेवटच्या 2 संधी मिळतील. ज्यांना नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची आहे, ते 2025 साठी तयारी करतील परंतु पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर मात्र बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. यासंदर्भात शासनाने विचार करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने