युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी फोन करुन केलं PM मोदींचं कौतुक; म्हणाले...

युक्रेन: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काल फोनवर चर्चा झाली. झेलेन्स्की यांनी ट्विटच्या माध्यमातून या चर्चेबद्दल माहिती दिली आहे.आपण मोदींशी फोनवरुन संवाद साधला, असं झेलेन्स्की यांनी सांगितलं. ते म्हणाले की, शांतता सूत्राच्या अंमलबजावणीमध्ये त्यांना भारताच्या सहभागाची अपेक्षा आहे. G20 चं अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवण्यासाठी झेलेन्स्की यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच संयुक्त राष्ट्रांनी युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.



झेलेन्स्की आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना G20 च्या यशस्वी अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या. याच मंचावर त्यांनी शांतता फॉर्म्युला जाहीर केला. आता त्याच्या अंमलबजावणीत भारताच्या सहभागाची अपेक्षा करतो."रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि झेलेन्स्की यांच्याशीही अनेकदा फोनवर बोलले आहेत, तसंच शांतताही प्रस्थापित कऱण्याचा प्रयत्न केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने