'भाऊचा बर्थ डे मग तर...', रितेशच्या वाढदिवशी सलमानची स्पेशल पोस्ट चर्चेत

मुंबई: रितेश देशमुख आणि जेनेलियाचा बहुचर्चित 'वेड' सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. सध्या सिनेमाचं प्रमोशन रितेश आणि जेनेलिया एकदम जोरदार करताना दिसत आहेत. 'वेड' सिनेमाच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलिया हे रीअल लाइफ कपल अनेक वर्षांनी एकत्र सिनेमात दिसणार आहेत,आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एका मराठी सिनेमात एकत्र मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत. सिनेमाच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या गारितेशच्या 'वेड' सिनेमातील नव्या रिलीज झालेल्या सलमानच्या गाण्याचे बोल आहेत,



 'वेड लावलंय...', यामध्ये सलमान आणि रितेश बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. सलमान या गाण्यातही काहीसा रावडी अंदाजात दिसला. पण यावेळी भाईगिरीचा नाही तर भाऊगिरीचा स्पेशल टच सलमानला या गाण्यातून दिलेला दिसला. या गाण्यातून सलमानची आणखी एक हूक स्टेप गाजणार एवढं मात्र नक्की. सध्या गाण्याच्या व्हिडीओवर सलमानचे चाहते मात्र भलतेच फिदा दिसतायत. अर्थात तसं त्याच्या अनेक चाहत्यांच्या कमेंट्सवरनं लक्षात येत आहे.ण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलंच होतं त्यात नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरनेही सिनेमाची उत्सुकता वाढवली आहे. आता सिनेमातलं नवं गाणं ते देखील सलमानचं समोर आल्यानं दबंग खानचा स्वॅग पाहून प्रेक्षक दंग होऊन गेलेयत. चर्चा तर गाण्याची होतीच,पण भाईचा 'भाऊ' अंदाज सगळ्यांनाच भावलाय हे गाणं पाहून. स्वतः सलमानने आपल्या इन्स्टावर रितेशच्या सिनेमातील त्या गाण्याला शेअर करत,रितेशला वाढदिवसाचं अनोख गिफ्ट देत शुभेच्छाही दिल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने