युद्धातील मदतीसाठी पुतीन यांची बेलारुसला भेट

रशिया  : रशियाने- युक्रेन युद्ध सुरू होऊन दहा महिने झाले आहे. रशियन सैन्याने युक्रेनवर आक्रमकपणे हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी (ता.१९) बेलारुसला भेट दिली. रशियाने काल किव्हमधील मूलभूत सुविधांवर ड्रोनने हल्ले केले. यामुळे युक्रेनमधील एक डझन भागात आपत्कालीन ‘ब्लॅकआउट’ झाले आहे. युक्रेनजवळील हवाई क्षेत्रात अमेरिकेची अनेक क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा रशियाने केला आहे.



या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पुतीन हे शेजारील देश बेलारुसला भेट दिली. युक्रेनविरेधात लढण्यासाठी बेलारुसने त्यांचे हवाई तळ रशियासाठी खुले केले होते. आता आणखी सैनिकी मदत मिळविण्यासाठी पुतीन यांनी बेलारुसला धावती भेट दिली. प्रदेशात एकच संरक्षण विभाग स्थापन करण्याबाबत बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्याशी चर्चा केल्याचे पुतीन यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने