भाजपच्या सत्तेला सुरुंग, आम आदमी पार्टीची विजयी वाटचाल

दिल्ली:  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिकेत अखेर आपने बाजी मारली आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता होती.आपने 171 जागा जिंकत आपने दिल्ली महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे. तर भाजपला 107 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.



रविवारी ४ डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान झाले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत २५० प्रभागांमध्ये एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच दिल्ली पालिकेवर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत १.४५ कोटी मतदार आहेत.2017 मध्ये, भाजपने तत्कालीन 270 पैकी 181 नगरपालिका वॉर्ड जिंकले होते, तर AAP फक्त 48 जिंकले होते. कॉंग्रेस 30 जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने