'थोडी किंवा जास्त प्या शेवटी या आजाराचा धोका कायम' WHOचा मद्यपिंना सूचक इशारा

दिल्ली: मद्यपेयींसाठी ही माहिती महत्वाची असून तुम्हाला पिण्याचे भयंकर वेड असेल तर ते आजच सोडा. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आता सूचक इशारा दिलाय. मद्यपिंनी ओव्हरड्रिंक केल्यास किंवा ते थोड्या प्रमाणातही पित असतील तरी त्यांना गंभीर आजार जडू शकतो. आता हा गंभीर आजार नेमका कोणता आहे आणि त्याबाबत Who ने कोणती चेतावणी दिली आहे ते आपण जाणून घेऊया.मागल्या अनेक वर्षांपासून मद्यपानाच्या वाढत्या प्रमाणावर बरेच रिसर्च झाले आहेत. दारूच्या विक्रीमध्ये कुठलाच प्रकार असा नाही ज्याने तुमच्या शरीराला हानी होत नाही. तज्ज्ञ डॉक्टर कॅरिना फेरेरा बोर्गेसने सांगितले आहे की दारूच्या प्रमाणाला घेऊन बरेच रिसर्च झाले आहेत. मात्र कोणीही मद्यपिंसाठी सेवनाचे योग्य प्रमाण एवढेच किंवा तेवढेच असल्याचा दावा करू शकत नाहीत.






काय सांगते स्टडी?

स्टडीमध्ये असे सांगितले गेले आहे की अल्कोहोलच्या सेवनाने 7 प्रकारच्या कँसरचा धोका वाढतो. यामध्ये माउथ कँसर. थ्रोट कँसर, लिव्हर कँसर, इसॉफॅगस कँसर, ब्रेस्ट कँसर, कोलन कँसर यांचा समावेश आहे. अल्कोहोल हा फार विषारी पदार्थ आहे. जो तुमच्या शरीरासाठी फार धोक्याचा आहे. यात एस्बेटस आणि तंबाखू यांसारख्या पदार्थांचाही समावेश असतो.

WHO चा दावा

WHO ने दावा केलाय की. इथॅनॉल (अल्कोहोल) हे कँसरचं कारण ठरतं. अर्थात तुम्ही मद्यपान कमी प्रमाणात केलं किंवा जास्त प्रमाणातही केलं तरी त्याचा धोका या कायमच असेल. तसेच मद्यपान केल्याने तुमच्या शरीरात कँसरचा धोका वाढतो. पुढे आलेल्या आकड्यांनुसार युरोपीय क्षेत्रांमध्ये कँसरवाढीमागे मद्यपान कारणीभूत ठरलं आहे.डॉ. फरेरा बोर्गेसच्या मते, दिवसेंदिवस लोकांच्या मद्यपान करण्याच्या प्रमाणात वाढ चालली आहे. याकडे दुर्लक्षित करणं योग्य नाही. कँसरने मृत्यूच्या कारणामागे मोठ्या प्रमाणात अल्कोहोल कारणीभूत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने